फलटण टुडे ( फलटण ) दि.28 :-
लोकांमध्ये जनजागृती व फसवणूक टाळण्याच्या हेतूने भारतीय मानक ,ब्युरो म्हणजेच बी.आय. एस. या संस्थेने “स्टॅंडर्ड क्लब” ची स्थापना सातारा जिल्ह्यातील नामांकित शाळांमध्ये सुरुवातीस करण्यात आली होती . अशा शाळांमध्ये फलटण तालुक्यातील फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण हे एक आहे.
या क्लब अंतर्गत शाळांमध्ये, कॉलेजेस मध्ये निरनिराळे उपक्रम घेतले जातात. त्या अंतर्गत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन घेण्यात आली होती. या उपक्रमाचा हेतू विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती, नाविण्यताभ व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा होता.या उपक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य श्री कोळेकर ज्ञानदेव नारायण यांनी केले.
यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य श्री काळे बाळकृष्ण दादा,शिक्षक, शिक्षिका व पालक हे ही उपस्थित होते. तसेच उपक्रमास परीक्षक म्हणून सौ. कदम पुनम विजय (जीवशास्त्र, विभाग प्रमुख) ,श्री कदम राजेंद्र दशरथ (भौतिक शास्त्र, विभाग प्रमुख). व श्री खरात सुनील महादेव ( रसायनशास्त्र, विभाग प्रमुख) हे लाभले होते. दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंची खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी तसेच एखाद्या वस्तूच्या निर्मिती मागे भारतीय मानक ब्युरो चे योगदान असते हे या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पोस्टरच्या मदतीने दर्शविण्यात आले होते. वस्तूंच्या निर्मिती मागे त्याची गुणवत्ता, सुरक्षितता, तसेच पर्यावरणास कमीत कमी होणारा अपाय या बाबींचा समावेश यामध्ये केला होता.
भारत सरकारने सोन्या चांदीच्या दागिन्यावर हॉलमार्किंग असणे बंधनकारक केले आहे. हॉलमार्किंग, वस्तूची गुणवत्ता व त्याची वैधता ” बी.आय. एस. केअर ॲपच्या मदतीने कशा पद्धतीने तपासता येईल हे ही याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पालकांना व शिक्षकांना दर्शविले.