चायनीज मांजाची होळी करताना विद्यार्थी व शिक्षक बापूराव सूर्यवंशी,अमोल नाळे व कर्मचारी रिटे
फलटण टुडे (फलटण) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे नागपंचमी सना निमित्त शहरात आणि तालुक्यात सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्यामुळे अनेक पशुपक्षी तसेच अनेक व्यक्ती यापूर्वी दगावले आहेत या होणाऱ्या त्रासापासून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने विद्यालयामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि गोविंद फौंडेशन यांच्या मार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली .
यावेळी बोलताना प्रा. सुधीर इंगळे यांनी नागपंचमीचा सण का साजरा केला जातो व नागांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच चायनीज मांज्यामुळे पशुपक्ष्यांचे होणारे मृत्युव तसेच मनुष्याचे होणारे मृत्यु व नुकसान याबद्दल जनजागृती पर आपले विचार व्यक्त केले . विद्यार्थ्यांना चायनीज मांजा न वापरण्याची यावेळी शपथ देण्यात आली .
यावेळी बोलताना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा बाबासाहेब गंगवणे यांनी चायनीज मांजा किती घातक आहे या मांज्यामुळे अनेक व्यक्तींचे तसेच लाहन मुलांचे प्राण गेले आहेत . तसेच या मांजामुळे अनेक पशु पक्षी यामधे आडकून गतप्राण झाले आहेत . त्यामूळे अशा दुर्घटना कशा टाळता येतील व चायनीज मांजा विरहित नागपंचमी कशी साजरी करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले .
यानंतर रॅलीला सुरुवात झाली ही रॅली मुधोजी हायस्कूल येथून राजे उमाजी नाईक चौक मार्गे मालोजीराजे सहकारी बँक , श्रीराम मंदिर राजवाडा चौक (टोपी चौक ) , पाचबत्ती चौक , रविवार पेठ सिमेंट रोड , बारामती चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ बाबासाहेब अंबेडकर चौक , महावीर स्तंभ मार्गे मुधोजी हायस्कूल येथे येऊन सांगता झाली यावेळी विद्यार्थ्यांनी चायनीज मांजा न वापरण्या विषयी अनेक घोषणा देत जनजागृती केली.
यावेळी गोविंद फौंडेशनचे डॉ गायकवाड , पर्यवेक्षक व्ही जी शिंदे , शिक्षक वृंद , विद्यार्थी , इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय मोहिते यांनी केले तर आभार लतिका अनपट यांनी मानले .
तसेच यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थांनी चायनीज मांजा ची होळी केली व निषेधाच्या विविध घोषणा दिल्या व आपण स्वतः चायनीज मांजा वापरनार नाही व इतर लोकांनाही वापरण्यापासून परावृत्त करू अशी शथथ घेतली .