बारामती मध्ये जागतिक छायाचित्र दिना निमित्त फोटोग्राफर चा सन्मान

जागतिक छायाचित्र दिना निमित्त साजरा करताना बारामती तालुक्यातील फोटोग्राफर

फलटण टुडे (बारामती):
शनिवार १९ ऑगस्ट रोजी गौरी डिजिटल फोटो लॅब यांच्या वतीने बारामती तालुक्यातील फोटोग्राफर यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी लग्नसमारंभ, राजकीय, नैसर्गिक,चित्रपट आदी क्षेत्रातील फोटोग्राफर उपस्तीत होते व
फ़ोटोग्राफी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान,नवीन समस्या व त्यावरील उपाय योजना, अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज व आधुनीक कॅमरे चालवण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज या विषयी चर्चा व त्यासाठी कार्यशाळा आयोजन करण्याचे नियोजन आदी विषयावर विचार विनिमय करण्यात आला.
कोरोना काळात मृत्युमुखी पडलेले ज्येष्ठ फोटोग्राफर कै बबनराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण चा संदेश सर्व दूर जावा व प्रत्येकाने घरासमोर, शेतात,अपार्टमेंट मध्ये वृषरोपण करावे या उदेश्याने प्रत्येक फोटोग्राफर ला 
गुलाब, मोगरा, जास्वंद,जुई व इतर रोपटे देईन सन्मान करण्यात आला व केक कापून छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.
 क्षणाक्षणाला बदलत्या काळात फोटोग्राफी क्षेत्रातील आव्हाने बदलत आहेत त्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना सर्वांनी विचार देवाण घेवाण करणे गरजेचे असून धावपळीच्या युगात स्वतःचे आरोग्य जपत ग्राहकांना सेवा द्या असा सल्ला गौरी डिजिटल लॅब चे संचालक सचिन सावंत यांनी दिला .
विविध क्षेत्रातील फोटो ग्राफर यांनी मनोगत व्यक्त केली 
आभार निखिल काळे यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!