फलटण टुडे ( बारामती प्रतिनिधी):
बारामती एमआयडीसी येथील इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन (फेरेरो इंडिया ) यांचा १२ वा वर्धापन दिन शनिवार १९ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.या प्रसंगी युनियन अध्यक्ष रमेश बाबर,सचिव अमोल पवार,उपाध्यक्ष संदिपकुमार बिचकुले,कार्याध्यक्ष प्रविणकुमार थोरात,कार्यअध्यक्ष चंद्रशेखर नाळे,खजिनदार आनंदकुमार जाधव,
सहसचिव सचिन पिंगळे,
सदस्य संतोष पवार,भाग्यश्री माने
लक्ष्मी धेंडे,रमोला आवाळे
आदी मान्यवर उपस्तीत होते.
युनियन फलकाचे पूजन व वृषरोपण करण्यात आले.
उत्कृष्ट वेतन करार व प्रत्येक कर्मचारी व त्याचे कुटूंब आर्थिक सक्षम झाले पाहिजे या साठी प्रत्यनशील असून कर्मचाऱ्यांची भक्कम साथ व पाठिंबा यामुळे युनियन म्हणून उत्तम काम करू शकत असल्याचे अध्यक्ष रमेश बाबर यांनी सांगितले .