फलटणच्या मुधोजी हायस्कूलला राज्यस्तरीय 'महाराष्ट्र समाज भूषण' पुरस्कार जाहीर

फलटण टुडे(फलटण) : –
फलटण येथील नामांकित व १५० वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या विद्यालयाने आजपर्यंत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाज भूषण’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण या विद्यालयाच्या शिक्षक सहकाऱ्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे फलटण तालुक्याच्या परिसरात शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख वाढला . याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

इंडियन टॅलेंट सर्च या संस्थे मार्फत यासाठी वर्षभराचे विद्यालयाचे शैक्षणिक मूल्यमापन करण्यात आले व त्यानंतर गुणवत्तेत व विविध निकषात बसल्यानंतर यंदाचा शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाज भूषण ‘ हा पुरस्कार मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण यांना जाहिर झाला आहे.

‘महाराष्ट्र समाज भूषण’ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते २४ सप्टेंबर २०२३ (रविवारी ) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रम प्रसंगी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 या पुरस्कारा सोबतच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाना मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महोदयांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!