विद्यार्थांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविताना तदसीलदार अभीजीत जाधव , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण) :
फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज या ठिकाणी मा. अभिजीत जाधव तहसीलदार फलटण यांच्या प्रमुख उपस्थित महसुल सप्ताहाच्या निमित्ताने कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण चे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले. यावेळीबोलताना प्राचार्य बाबासाहेब गंगावणे म्हणाले की आपल्या कार्यालयाकडून आम्हाला सतत काही ना काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनांचा तुम्ही वेळोवेळी आम्हाला लाभ देत असता अशा कार्यक्रमाचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवता . त्याबद्दल त्यांचे व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले .
यावेळी फलटण तहसीलदार मा. अभिजीत जाधव यांनी शासनाच्या विविध योजनांचा च्या बद्दल विदयार्थयांना मार्गदर्शन केले या योजनांचा लाभ घेण्याचा विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले .महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही विविध योजनांचे आयोजन केले आहे त्या योजनांपासून कोणीही विद्याार्थी वंचित राहता कामा नये यासाठी आमचा प्रयत्न आहे असे यावेळी बोलताना तहसीलदार अभिजीत जाधव म्हणाले . तसेच यावेळी माध्यमिक विभागामधील गुणवंत विदयार्थयांना त्यांनी विविध परीक्षेत प्राविण्य मिळवल्या बद्दल त्यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
यावेळी तहसील कार्यालयातील सौ सावंत मॅडम लक्ष्मण अहिवळे , प्रशालेचे ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य देशमुख , प्रा. सुधाकर वाकुडकर , प्रा. संदीप पवार , क्षिरसागर आण्णा यावेळी उपस्थित होते .
यावेळी सुत्रसंचलन प्रा. पवार यांनी केले तर आभार उपप्राचार्य देशमुख यांनी मानले