फलटण टुडे (बारामती ):
बारामती एमआयडीसीतील ताटे इलेक्ट्रिकल्सचे संचालक पीयूष ताटे यांना आंत्रप्रुनर्स इंटरनॅशनल क्लब पुणे यांच्या वतीने ‘उत्कृष्ट युवा उद्योजक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी व अनेकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिल्याबद्दल नवउद्योजकांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते.औद्योगिक क्रांतीचे जनक जे. आर. डी. टाटा यांच्याजयंती निमित्त(शनिवार २९ जुलै)
पुरस्कार दिला जातो.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महावितरण कंपनीला लागणारे ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्यामध्ये त्यांनी केलेल्या योगदानाचा विचार करून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले
उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयात भरीव कामगिरी करणाऱ्या युवा उद्योजकाला दरवर्षी सदर पुरस्कार देण्यात येतो .
बिव्हीजी कंपनीचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी आंत्रप्रुनर्स इंटरनॅशनल क्लब अध्यक्ष अतुल कुलकर्णी व अनिल काळे
आदी मान्यवर उपस्तीत होते
————————