फलटण टुडे(फलटण दि. 26 ) :
मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 31 जुलै व मंगळवार दि.01 आँगस्ट या दोन दिवशी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी दिली.
इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होण्यासाठी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. 31 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या शुभहस्ते होणार आहे .व श्री.शिवाजीराव घोरपडे , अध्यक्ष ,क्रीडा समिती , फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डाँ. पी.एच कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .
या स्पर्धेमध्ये खो-खो (मुले, मुली), कबड्डी,( मुले – मुली ) ॲथलेटिक्स (100 मीटर व 400 मीटर धावणे) , 4 *100 मी. रिले धावणे, गोळाफेक (मुले – मुली ) इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे . या क्रीडा स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ बुधवार दि.02 आँगस्ट 2023 रोजी दु. 12.00 वा .मा.श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर , मा.सभापती , पंचायत समिती ,फलटण यांच्या शुभहस्ते होणार आहे . सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे .
सदरच्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी जिमखाना विभाग व खेळ समन्वयक शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्राचार्य एस. आर. वेदपाठक यांनी केले आहे.