फलटण टुडे (बारामती ):
बारामती तालुक्यातील बँकिंग क्षेत्रातील सर्व ज्ञान व अचूक मार्गदर्शन करणारी ‘आय बी टी ‘ इन्स्टिटयूट च्या वतीने या वर्षी विविध बँकिंग परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
आय बी टी चा विद्यार्थी शुभम साबळे याची आय डी बी आय बँकेच्या असिस्टंट मॅनेजर पदासाठी, तनया गडलिंग या विद्यार्थिनीची फूड कोर्पोरेशन ऑफ इंडिया च्या असिस्टंट पदासाठी व भाऊसाहेब सरगर या विद्यार्थ्याची महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे.
बँकिंग क्षेत्रा बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेताना अचूक मार्गदर्शन केल्यानेच पहिल्या प्रत्यनात सहज यश मिळाल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत मध्ये सांगितले.
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी सहज यशस्वी होतो आम्ही फक्त मार्गदर्शन करतो व अभ्यास करवून घेत असल्याचे आय बी टी च्या संचालिका सारिका शहा यांनी सांगितले.
आभार लौकिक शहा यांनी मानले.