उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरावर एकत्रित प्रयत्न करण्याची गरज….धनंजय जामदार

फलटण टुडे (बारामती):

महाराष्ट्राच्या विविध भागातील उद्योगांचे अनेक प्रश्न समान असून ते सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असून यामध्ये बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन महत्त्वाची भूमिका पार पाडेल असे असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील मासिया औद्योगिक संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी आज बारामती एमआयडीसीला अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट दिली त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.

बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, कॉटन किंगचे प्रकल्प प्रमुख खंडोजी गायकवाड, टेक्स्टाइल पार्कचे अनिल वाघ, उद्योजक आशिष पल्लोड आदींनी शिष्टमंडळाचे स्वागत करून संवाद साधला.

बारामतीला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये
मासियाचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सदस्य कमलाकर पाटील, सर्जेराव साळुंके, सुरेश खिलारे, राजेंद्र चौधरी, पी के गायकवाड, राहुल मोगले, सलील पेंडसे, शरद चोपडे, दिलीप चौधरी, उदय देशमुख आदींचा समावेश होता.

एमआयडीसीकडून मागील सहा वर्षापासूनची जीएसटी वसुली, अवाजवी वीज दरवाढ, ग्रामपंचायत कर, कुशल मनुष्यबळाची कमतरता, अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा अभाव, कायदा व सुव्यवस्था आदींच्या समस्या राज्यातील सर्व उद्योगांना भेडसावत असून शासन दरबारी असे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांनी एकत्रित प्रयत्न करणेबाबत बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन व मासियाच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा यावेळी झाली.

उद्योगांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच राज्यात, परराज्यात तसेच परदेशात उद्योजकांचे अभ्यास दौरे वेळोवेळी आयोजित करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व नवीन बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत असलेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!