फलटण टुडे (बारामती ):
९ जुलै रोजी जनहित कला क्रीडा ट्रस्ट निमगाव केतकी आयोजित भव्य आंतरशालेय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत ३२ किलो वजन गटामध्ये बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता ८ वी मधील आदित्य सचिन सावंत अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत विजय मिळवला.मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दीपक बिबे सर, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे , सर्व शिक्षक , शिक्षिकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग यांनी विशेष कौतुक केले.
—————-