आय. एस. एम. टी ,किर्लोस्कर चे प्रमुख किशोर भापकर यांना किर्लोस्कर आयकॉन पुरस्कार

किशोर भापकर यांचा सन्मान करताना मान्यवर

फलटण टुडे (बारामती ): 
राज्यातील किर्लोस्कर समूहाच्या वतीने बारामतीतील आयएसएमटी किर्लोस्कर प्रकल्पाचे प्रमुख किशोर भापकर यांना बारामती आयएसएमटी किर्लोस्कर प्रकल्पाने कंपनीच्या ईबीआयटीडीए (अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डिप्रिसीएशन अँड अमोर्टायझेशन) वाढीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल किर्लोस्कर आयकॉन या पुरस्काराने गौरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात किर्लोस्कर समूहाचे एक्झिक्युटीव्ह चेअरमन अतुल किर्लोस्कर व कार्यकारी संचालक आर.व्ही. गुमास्ते यांच्या हस्ते किशोर भापकर यांना पुण्यात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराने गौरविण्यात आले.
किशोर भापकर यांच्या नेतृत्वाखाली बारामती प्रकल्पाने भरीव योगदान दिले, त्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
किर्लोस्कर समूहाच्या आयएसएमटी प्रकल्पाचा ईबीआयटीडीए 80 कोटी वरुन 235 कोटींवर गेला आहे. त्यात बारामती प्रकल्पाचा सिंहाचा वाटा आहे. किर्लोस्कर समूहाने आयएसएमटी कंपनी हस्तांतर करुन घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.अभियंता ते वरिष्ठ उपाध्यक्ष,असा प्रवास करताना भापकर यांनी सूक्ष्म पणे कामकाज चालवत कर्मचारी व व्यवस्थापन या मधील म्हतपूर्ण स्थान निर्माण करून समतोल साधला आहे .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!