सुजाण नागरिक घडण्यासाठी दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण मिळणे महत्वाचे: संध्या नगरकर

अंगणवडी सेविका व पदाधिकारी आणि संध्या नगरकर

फलटण टुडे (बारामती ): 
   “सुजाण नागरिक घडण्यासाठी दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण मिळणे, मुलांची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी ह्यासाठी अंगणवाडीमध्ये विविध अनुभव व कृतीच्या देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत,”,असे मत एकात्मिक बालविकास सेवा योजना च्या अधिकारी संध्या नगरकर यांनी व्यक्त केले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना, महिला व बालविकास विभाग, शहरी प्रकल्प व अनुबोध-योजक संस्था, पुणे यांच्या माध्यमातून बारामती व इंदापूर येथील निवडक अंगणवाड्यांमध्ये पूर्वप्राथमिक गुणवत्ता विकसन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आकारवर आधारित अभ्यासक्रमाची पालकांना ओळख व्हावी या करिता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संध्या नगरकर बोलत होत्या. या प्रसंगी मा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,महिला व बालकल्याण समिती च्या मा सभापती सुजाता चव्हाण, व राजश्री आगम आणि अंगणवाडी सेविका समिती च्या पदाधिकारी उपस्तीत होत्या.
बारामतीमधील पतंग शहानगर, सिद्धेश्वर गल्ली, खाटिकगल्ली, आमराई, कोअर हाउस, इंदापूररोड याठिकाणी पालक मेळावे घेण्यात आले. असेच मेळावे इंदापूर येथील निवडक अंगणवाड्यांमध्ये ही घेण्यात आले .बारामती येथील मेळाव्याला ५५० पालकांनी उत्स्फुर्तपणे उपस्थिती दर्शवली.त्यांनी अंगणवाडीमध्ये घेण्यात येणारी वाचन-लेखन पूर्वतयारी, गणित पूर्वतयारी, बोधात्मक व सृजनशील कृती यांसारख्या कृतीची माहिती घेतली,.तसेच पहिला जाण्याची तयारी कशी होते हे जाणून घेतले.
जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याला ३ वर्ष पूर्ण झाल्यास त्याचे नाव अंगणवाडी मध्ये नोंदवावे असेही आवाहन त्यांनी केले.
बारामती नगरपरिषद च्या महिला बाल कल्याण विभागाची माहिती पौर्णिमा तावरे यांनी दिली 


 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!