बारामती:
जिल्हा क्रीडा संकुल येथे जागतिक मल्लखांब दिन निमित्त ( गुरुवार १५ जून) द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब बारामती यांच्या वतीने मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करून व या क्षेत्रातील खेळाडूचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक शिवानी जाधव,आकाश गवळी व सहकारी खेळाडू यांनी मल्लखांब खेळाबद्दल माहिती व प्रात्यक्षिक सादर केले.
या प्रसंगी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, हॉलीबॉल प्रशिक्षक शिवाजी गावडे, जिम प्रशिक्षक अनिल जगताप, कराटे प्रशिक्षक रवींद्र कराळे, अभिमन्यू इंगोले मीनानाथ भोकरे,सुयोग घुले आदी मान्यवर उपस्तीत होते .
पुरातन काळापासून मल्लखांब ही भारतीयांनी दिलेली जगाला महान देणगी आहे . जीवनात वापर करून किंवा नियमित सराव केल्यामुळे शरीरात चपळता येते, सर्वांगीण व्यायाम होतो व संतुलन राहण्यास मदत होते जागतिक क्रीडा प्रकारात याचा समावेश केल्याने अनेक खेळाडूंना करिअर घडवण्याची संधी मिळत असल्याचे प्रशिक्षक शिवानी जाधव यांनी सांगितले.