हनुमान नगर मध्ये लाठीकाठी मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर संपन्न

यशस्वी विद्यार्थ्यां समवेत मान्यवर

फलटण टुडे (बारामती ):  
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि हनुमान नगर महिला बचत गट ग्रुप आयोजित श्री शिवसुर्य शस्त्रविद्या संवर्धन बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने लाठीकाठी मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते .गुरुवार दि १५ जून रोजी २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन समारोप करण्यात आला .
या प्रसंगी 
अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी माने , महिला अध्यक्षा अर्चना सातव,
उपाध्यक्ष ज्योतीताई जाधव ,बचत गटाच्या उपाध्यक्ष हर्षदा ताई सातव, शिवसूर्य संवर्धन बारामती चे पितांबर सुभेदार , कायदेशीर सल्लागार अॅड. विनाताई फरतडे, कल्याण पाचांगणे , रवींद्र थोरात ,वर्षाताई थोरात, नम्रता ढमाले, हेमंत नवसारे, गणेश काळे, कुमार चव्हाण ,सुदर्शन नितळ ,शिवाजी घाडगे प्रकाश सातव ,सर्व बचत गट चालक आदी मान्यवर उपस्तीत होते.
बारामती शहर , माळेगाव रोड ,हनुमान नगर या परिसरात मुला मुलींसाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.
 दि ६ जून ते १५ जून दरम्यान झालेल्या प्रशिक्षणात मुले अगदी सरायत पद्धतीने काठी फिरवू लागली मुलींनाही आत्मविश्वास वाढला स्वतःचे संरक्षण करण्याबाबत.. कुमारी वैष्णवी रणदिवे गायत्री पांचाळ सई बारवकर,प्रियांका आवाडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
 नम्रता ताई ढमाले यांनी स्वतः हा बनवलेल्या सर्वेशपेन्सिल मुलांना वाटप केल्या. 
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलींना प्रशिक्षण मिळावे ,स्व स्वरक्षण करता यावे ,काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्रातील मुलींची गायब होण्याची संख्या पाहता परिसरातील मुलींनी “स्व:रक्षणासाठी” सक्षम व्हावे त्यासाठी या तलवार बाजी,लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात आल्याचे अयोजिका अर्चना सातव यांनी सांगितले .
संभाजी माने, पितांबर सुभेदार यांनी प्रशिक्षण दिले 


 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!