अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

बारामती: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षा मध्ये कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक नेहा दत्तात्रय झगडे (९१.८०%) द्वितीय क्रमांक प्रगती ओमप्रकाश शिंदे ( ९०.८०%) व तृतीय क्रमांक ओम शहाजी गावडे (८५.२०%) हे अव्वल आले आहेत तसेच शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली.
         संस्थेचे अध्यक्ष संग्राम मोकाशी ,सचिव संगीताताई मोकाशी, प्राचार्य प्रशांत वणवे यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले गुणवत्ता व दर्जा देत तर त्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याचे अध्यक्ष संग्राम मोकाशी यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!