फलटण टुडे (बारामती ): –
रक्तदान शिबिर, ज्ञानदानाचे कार्य आदी माध्यमातून समाजसेवा करणारे पवार कुटूंबियाचे कार्य आदर्शवत असून वैदकीय क्षेत्रात सुद्धा उत्तम सेवा देणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
पवार डेंटल क्लीनिक च्या उदघाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते या प्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,
सतीश खोमणे, बाळासाहेब तावरे अँड. एस एन जगताप नंदकुमार मोरे, ओंकार पवार , डॉ प्रदीप व्होरा , डॉ. सतीश पवार डॉ.राजेंद्र दोशी डॉ. वैशाली पांडुरंग जिरगे डॉ. राजेंद्र मुथा , मंदार शिकची ,डॉ. रूपाली भगत ,डॉ.श्रीकांत वेताळ आदी मान्यवर उपस्तीत होते.
मुली वैदकीय क्षेत्रात मुलापेक्षा जास्त यश मिळवत आहेत हे कौतुकास्पद असून बारामती शहराची लोकसंख्या व विकास वाढत असताना पवार डेंटल क्लीनिक रुग्णांना उत्तम सेवा देईल असेही अजित पवार यांनी सांगितले.
दंत क्षेत्रातील रुग्णाच्या मागणीनुसार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुविधा युक्त क्लीनिक सुरू केल्याचे भारतीय आयुर्विमा चे विकास अधिकारी तुकाराम पवार यांनी सांगितले.
उपस्तितांचे स्वागत ओंकार पवार यांनी केले तर आभार डॉ.स्नेहल पवार यांनी मानले.
————————–