फलटण टुडे (फलटण): –
नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या निकाला मध्ये फलटण शहरातील नामवंत शाळा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल सी बी एस ई, जाधववाडी ,फलटण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी परंपरेप्रमाणे याहीवर्षी पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन केले आहे.
यामध्ये वाणिज्य शाखा – प्रथम क्रमांक चेतना बाबा सरक (८५.२०%) मेहक जगदीश पटेल (८५.२०%)
शास्त्र शाखा – प्रथम क्रमांक राजवर्धन चंद्रशेखर जगताप (७७.२०%)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषदेचे आमदार मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम , अधिक्षक श्रीकांत फडतरे , तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा प्राचार्या मिनल दिक्षीत. तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शाळा समितीचे सर्व पदाधिकारी , प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्य .