रिअल डेअरी मध्ये विक्रमी वेतन वाढ

कर्मचाऱ्यांना वेतन वाढीचे पत्र देताना चेअरमन मनोज तुपे व इतर 

फलटण टुडे (बारामती ):
बारामती एमआयडीसी मधील रियल डेअरी प्रा लि मध्ये कर्मचारी यांना 5 हजार ते दहा हजार रुपयांची वार्षिक वेतनवाढ कंपनी प्रशासना च्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
वेतनवाढी चे पत्र कंपनी प्रशासन च्या वतीने कर्मचारी यांना देण्यात आले या प्रसंगी रियल डेअरी चे चेअरमन मनोज तुपे, कार्यकारी संचालिका अनिता तुपे,प्रेसिडेंट प्रशांत अपराजित,एच आर मॅनेजर सुशांत शिर्के, फायनान्स मॅनेजर प्रीतम पारखे व प्रवीण तावरे ,राहुल जाधव, योगेश जगताप, अजित कदम, महेश बेलदार, विशाल भापकर, परशुराम इरकर,अशोक सोंडगे आदी मान्यवर उपस्तीत होते.
वाढती महागाई, शासनाचे बदलते धोरण,बाजारपेठ मधील मंदी,वाढती स्पर्धा आदी कारणाने दूध डेअरी क्षेत्रातला आर्थिक फटका बसत असताना सुद्धा रियल डेअरी च्या प्रगती मध्ये कर्मचारी व अधिकारी यांचे योगदान महत्वाचे असल्याने सदर वार्षिक वेतन वाढ कंपनी प्रशासन च्या वतीने देण्यात येत असल्याचे चेअरमन मनोज तुपे यांनी सांगितले.
 2023 ते 2024 वर्षासाठी सदर वेतनवाढ असून कंपनी कंपनीने दाखविलेले दार्तुत्व महत्वपूर्ण असून कंपनीची प्रगती म्हणजे कुटूंबाची प्रगती असल्याचे कर्मचारी व अधिकारी यांनी वेतनवाढ नंतर सांगितले.




———————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!