मिस्टर आँलम्पिया बॉडी बिल्डर श्री. सुहास खामकर मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख आकर्षण !!!

*

फलटण टुडे (फलटण) :- 
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटणचा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि.12 मे 2023 रोजी जिमखाना विभाग , मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डाँ.पी.एच. कदम यांनी दिली आहे . सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील महाराष्ट्रातील अव्वल खेळाडू,तहसीलदार,मुंबई शहर, आणि शिवछञपती पुरस्कार विजेते मा.श्री.सुहास खामकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य खो- खो असोसिएशनचे ,अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे , सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2022-23 मधे क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागातील जिल्हा , राज्य , राष्ट्रीय , आंतर विभाग , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर , अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा मधे विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू – कलाकार, एन.सी.सी.- एन.एस.एस. , व गुणवत्ताधारक विद्यार्थी यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावेळी फलटण तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे .तरी खेळाडू , कलाकार , गुणवंत विद्यार्थी ,पालक यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पी. एच .कदम यांनी केले आहे .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!