फलटण टुडे (बारामती ): –
रुई येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे पदाधिकारी सुरज चौधर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयास संगणक संच भेट दिला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सदर संच कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी शहर अध्यक्ष जय पाटील, तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, शहर अध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मीडिया प्रमुख तुषार लोखंडे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
सामाजिक काम करताना नवीन कार्यालयात पक्षाच्या दैनंदिन कामकाज अत्याधुनिक व्याहवे म्हणून सदर संच भेट देऊन संजय गांधी निराधार योजना व शासकीय योजनांची माहिती नागरिक व कार्यकर्ते यांना होणे साठी संगणकाचा वापर होईल असेही सूरज चौधर यांनी सांगितले