श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर
फलटण टुडे (फलटण) : –
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उप -सभापती पदाच्या निवडी आज दि ११ मे रोजी जाहिर झाल्या.
आज झालेल्या निवडीमध्ये बाजार समितीच्या सभापती पदी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तर उपसभापतीपदी भगवानराव होळकर यांची एकमताने पुन्हा एकदा निवड करण्यात आली.
यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची एक हाती सत्ता बाजार समितीवर आलेली आहे.