श्रीमंत संजीवराजे यांच्या मुळे फलटणला ॲथलेटिक्स व रनिंग मूव्हमेंट सुरू झाली : राजगुरू कोचळे

फलटण (फलटण टुडे ) : –

श्रीमंत संजीवराजे यांनी फलटणमध्ये क्रीडा चळवळ सुरू केली आहे, ती कौतुकास्पद आहे. फलटण मध्ये खो-खो, हॉकी क्रीडा प्रकार जास्त चालतात. ॲथलेटिक्स खेळ फलटण तालुक्यात मागे पडला होता, परंतु श्रीमंत संजीवराजे यांनी लक्ष घालून ॲथलेटिक्स खेळाला पुढे आणले आहे, त्यामुळे फलटणला ॲथलेटिक्स व रनिंग मूव्हमेंट सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे ही फलटण मॅरेथॉन स्पर्धा आहे. आयोजन समितीने चांगल्या प्रकारे स्पर्धेचे नियोजन केले आहे. स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धकांनी चांगल्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण करायची आहे व स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे असे प्रतिपादन करून सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजगुरू कोचळे सर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती , फलटण यांच्या तर्फे मुधोजी क्लब, फलटण येथे मंगळवार दि. २ मे २०२३ रोजी फलटण मॅरेथॉन २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजगुरू कोचळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कोचळे सर बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य शिरीष वेलणकर, महादेव माने, फ.ए.सो. प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी.एम. गंगवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागात मॅरेथॉन स्पर्धा व्हाव्यात व त्याचा लाभ ग्रामीण खेळाडूंना मिळावा, त्यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने फलटण येथे तालुक्याच्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये फलटणमध्ये फूल व हाफ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, त्यादृष्टीने आत्तापासूनच खेळाडूंनी सराव सुरू करावा असे आवाहन करून सहभागी स्पर्धकांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.

फलटण मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
खुला गट पुरुष -१० कि.मी. विजेते – प्रथम क्रमांक बाळू पोकळे (मांढरदेव), द्वितीय क्रमांक आदित्य चव्हाण, तृतीय क्रमांक शिवराज इंगळे
खुला गट महिला – ८ कि.मी.विजेते – प्रथम क्रमांक आरती बाबर (माणदेश फाउंडेशन), द्वितीय क्रमांक अल्मास मुलानी, तृतीय क्रमांक प्रतीक्षा शिंदे
४५ वर्षापुढील पुरुष – ३ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक प्रशांत जाधव, द्वितीय क्रमांक दत्तात्रय कदम, तृतीय क्रमांक सुनील गवळी
४५ वर्षापुढील महिला – २ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक संगीता उबाळे, द्वितीय क्रमांक इंदुमती गायकवाड, तृतीय क्रमांक उज्वला बोडरे
१८ वर्षे आतील मुले – ५ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक मोहित जगताप, द्वितीय क्रमांक शुभम माने, तृतीय क्रमांक नवनाथ दडस
१८ वर्षे आतील मुले – ३ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक शिवानी नरळे, द्वितीय क्रमांक चैताली चव्हाण, तृतीय क्रमांक प्रणोती कुचेकर

फलटण मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण केलेल्या ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीच्या वतीने ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जयश्री फणसे, भिमदेव बुरुंगले, अविनाश जगताप, प्रभावती कदम, रामचंद्र घोरपडे, महेंद्र आरगे, अशोक फडतरे, हिराचंद गोरे यांचा सहभाग होता.

मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मोहिते सर व रूपचंद बोबडे सर यांनी केले तर आभार फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ सर यांनी मानले.

मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी फलटण तालुका असोसिएशनचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, सचिव नामदेव मोरे, सहसचिव ॲड. रोहित अहिवळे, तायप्पा शेंडगे सर यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखेतील क्रीडा शिक्षक श्री राज जाधव सर, तांबे सर, श्री सुळ सर, श्री खुरंगे सर, श्री जाधव डी.एन., श्री माळवे सर, श्री उत्तम घोरपडे सर, श्री माडकर सर, गोंधळी सर, श्री सुरज ढेंबरे सर, कुमार पवार सर, श्री रोहन निकम, श्री मोहिते डी एम, श्री सुहास कदम सर , अविनाश गंगतीरे ,कु. धनश्री क्षीरसागर, कुमारी गव्हाणे मॅडम, सौ. गेजगे मॅडम, एन.सी.सी विभागाचे श्री पवार डी.जे, व सौ ननावरे मॅडम या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!