फलटण टुडे (फलटण ) :-
जैन सोशल ग्रुप,संगिनी फोरम व युवा फोरम याचां सन २०२३ ते २०२५ चा पदग्रहण समारंभ शनिवार दि.२९ एप्रिल२०२३ रोजी सकाळी १० वा. नवलबाई मंगल कार्यालय,फलटण येथे संपन्न होणार आहे.
जैन सोशल ग्रुपच्या नुतन अध्यक्षां म्हणुन सविता दोशी,सचिव म्हणुन प्रितम शहा,खजिनदार म्हणुन समिर शहा शपथ घेतील.
संगिनी फोरमच्या नुतन अध्यक्षां म्हणुन अपर्णा जैन,सचिव म्हणुन प्रज्ञा दोशी,खजिनदार म्हणुन मनिषा घडिया शपथ घेतील.
युवा फोरमचे नुतन अध्यक्ष म्हणुन तेजस रविंद्र शहा,सचिव पुनित दोशी म्हणुन ,खजिनदार म्हणुन मीहिर गांधी शपथ घेतील .
जैन सोशल ग्रुप महाराष्ट रिजनचे प्रेसिडेंट ऊन्मेशभई कर्नावट कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.रिजनचे व्हाईस चेअरमन सचिन दोशी नुतन पदाधिकारी यानां शपथ देतील.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन माजी रिजन प्रेसीडेंट राजेंद्र धोका,ज्येष्ट पञकार अरविंदभाई मेहता, रिजन पि.आर.ओ.सुनितभई परिख,संगीनी चेअरपर्सन सुवर्णाबेन सिसोदिया,कोल्हापुर झोन को आॅर्डिनेटर रज्जुबेन कटारिया, माजी रिजन प्रेसीडेंट मांगिलाल कोठारी ऊपस्थीत राहणार आहेत.