‘ *
अजित पवार यांचा सत्कार करताना धनंजय शिंदे व सोबत डी एस कन्स्ट्रक्शन चे सहकारी
(छायाचित्र दत्ता माने)
फलटण टुडे (बारामती ):
बारामती चा चौफर विकास होत असताना अनेक जण पुण्यानंतर बारामती ला राहण्यास पसंती देत आहे त्यामुळे गृह प्रकल्प ची संख्या वाढत आहे . ग्राहकांना उत्तम दर्जा व गुणवता देणारा ‘स्वप्नशिल्प’ गृह प्रकल्प बारामती च्या बांधकाम क्षेत्रात वैभवात भर घालेल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
जळोची येथील स्वप्नशिल्प गृह प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार २३ मार्च रोजी अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी अजित पवार बोलत होते .
या प्रसंगी बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष जय पाटील,जिल्हा परिषद चे मा. अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती इंडस्ट्रीयल मॅन्यु असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, मा. नगरसेवक अतुल बालगुडे व दीपक मलगुंडे, प्रताप पागळे,दत्तात्रय माने,श्रीरंग जमदाडे व प्रकाश देवकाते व परिवार व इतर मान्यवर उपस्तीत होते.
नोकरी च्या पाठीमागे न लागता शिंदे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेकांना रोजगार प्राप्त करून दिला व संतुष्ट समाधानी ग्राहक बारामती मध्ये निर्माण केल्याने शिंदे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
एक एकर मध्ये गृह प्रकल्प असून सर्व सामान्य नागरिकांच्या स्वप्नातील प्लॅट, बंगलो ,व्यवसायासाठी दुकाने, ऑफिसेस उपलब्ध करून देताना सर्व नामांमित कंपन्यांचे साहित्य बांधकाम साठी वापरून दिलेल्या कालावधी मध्ये बांधकाम पूर्ण करून देणार असल्याचे डी एस कन्स्ट्रक्शन चे संचालक धनंजय शिंदे यांनी सांगितले.
या वेळी उपस्तितांचे स्वागत संदीप पिंगळे, सुरेश पवार, धैर्यशील लांडगे, दीपक पवार यांनी उपस्तितांचे स्वागत केले
सुत्रसंचालन व अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार दीपक पवार यांनी मानले
—————————————–