बारामती नगर परिषद च्या पाककला व उखाणे स्पर्धे साठी महिलांचा प्रतिसाद

बारामती नगर परिषद आयोजित पाककला व उखाणे स्पर्धा साठी सहभागी महिला

फलटण टुडे (बारामती ): 
बारामती नगरपरिषद च्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील महिलांसाठी पर्यावरण, स्वछता, कचरा विलगिकरण, ओला कचरा सुका कचरा , ई कचऱ्याची विलेवाट आदी विषयावर पूना वाला गार्डन येथे उखाणा स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांचा गृहपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, मंगला सराफ, भारती मुथा, संध्या बोबडे, माजी नगरसेविका डॉ सुहासिनी सातव, दीपाली लालबिगे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अनिता गायकवाड व भगिनी मंडळ सदस्या प्रतिभा दाते आणि मुख्यधिकारी महेश रोकडे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सहभागी महिला बचत गट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या.
 पाककला व उखाणे स्पर्धा च्या माध्यमातून पर्यावरण व  
स्वच्छता,कचरा विलगिकरन या साठी जनजागृती व्हावी व महिलांचा सहभाग मोट्या प्रमाणात वाढावा म्हणून सदर स्पर्धेचे नगरपरिषद च्या वतीने आयोजन करण्यात आल्याचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
माझी वसुंधरा अंतर्गत ओला व सुका कचरा वेगळे करून घंटा गाडीत टाकावा, प्लास्टिक पिशवी वापरू नये त्याऐवजी कापडी पिशवी चा वापर करावा,, घरी ओला कचरा जिरवून त्या पासून कंपोस्ट खत तयार करावे, सौर ऊर्जेचा वापर करावा, ई कचरा म्हणजे काय ई कचरा नगरपरिषद कडे महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी जमा करावा, सुंदर, स्वच्छ व पर्यावरण पुरक बारामती साठी योगदान आदी विषयावर महिलांनी उखाणे सादर करून प्रश्नांना उत्तरे दिली.
विविध वयोगटातील विजेत्या महिलांना व मुलींना सन्मानित करण्यात आले. शहरातील विविध वार्ड मधील महिला बचत गट यांनी सुद्धा सहभाग घेऊन खाद्य पदार्थ दुकाने थाटली होती.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती पवार यांनी केले.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!