*
फलटण टुडे ( फलटण ) सातारा दि. 16 : हर घर दस्तक देऊन शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंच्या पात्र लाभार्थ्यांना एकत्रितपणे प्रत्यक्ष लाभ व सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने स्वंयस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी केले.
सदर उपक्रमाच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत पोहोचणार आहे व पात्र लाभार्थ्यांना लाभ दिले जाणार आहेत. तरी सदर अभियानामध्ये सर्व शासकीय विभागांनी झोकून देऊन काम करावे. जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही श्री. आवटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्हयात शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात येत आहे. शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा एकाच दिवशी किमान 75 हजार लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात संपन्न होणार आहे.