खेळाडूंना शिबीर उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , शिवाजीराव घोरपडे , महादेवराव माने , बाबासाहेब गंगवणे व इतर मान्यवर
फलटण टुडे ( फलटण ) :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या 15 दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खोअसोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. शिवाजीराव घोरपडे , मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य गंगवणे बी.एम, क्रीडा समितीचे सदस्य महादेव माने, मुधोजी हायस्कूलचे पर्यवेक्षक शिंदे व्ही.जी.व काळे एस एम हे उपस्थित होते.
यावेळी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपण सर्वजन उन्हाळी शिबीरात 15 दिवस प्रशिक्षण व मार्गदर्शन घेण्याकरता आपण आला आहात . कारण अलिकडे खेळ हा महत्त्वाचा विषय झालेला आहे . आपण रोज जे काही करत असतो त्यामधे व्यायामाला फार काही वाव मिळत नाही . पण आपल्या रोजच्या जीवनात खेळाला व व्यायामाला फार महत्व प्राप्त झाले आहे. तो जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे . त्यामुळे कोणताही एक खेळ हा खेळला गेला पाहिजे. खेळा मधून करिअर घडवले जाऊ शकते त्यामुळे खेळाडूंना अनेक ठिकाणी प्राधान्य दिले जाते. फलटण मध्ये अनेक खेळ लोकप्रिय आहेत व ते खेळले जातात त्यामुळेच अनेक गुणवान खेळाडू या फलटणच्या भूमीत तयार झालेले आहेत . ऑलम्पिक मधे खेळून आलेला प्रविण जाधव तसेच फलटण च्या अनेक मुली हॉकी मधे आहेत त्यामधे अक्षदा ढेकळे नावाची मुलगी आज हॉकीमध्ये भारताच्या टिममधे प्रतिनिधित्व करतेय तसेच फलटणला खो-खो ची मोठी परंपरा आहे . त्यामुळे फलटणला खेळाची मोठी परंपरा असल्याने ही परंपरा अशीच पुढे नेण्याची अवशकता आहे ते तुम्ही पुढे बसलेले खेळाडू ही परंपरा पुढे घेऊन जाऊ शकता. खेळामधे यशस्वी होण्यासाठी सातत्य , सराव , कष्ट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले .
यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन मा. शिवाजीराव घोरपडे साहेब यांनी या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा व हे प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर संबंधित खेळा चा दररोज सराव करावा. असे आवाहन करून प्रशिक्षण शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल2023 या कालावधीमध्ये होणार असून हॉकी , फुटबॉल , खो-खो हे खेळ श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे होणार आहेत. ॲथलेटिक्स,
व्हॉलीबॉल कुस्ती व कबड्डी हे खेळ मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहेत तसेच बास्केटबॉल मुधोजी क्लबच्या मैदानावर तर आर्चरी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी या क्रीडांगणावर होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना रोज सकस व पौष्टिक अल्पोपार दिला जाईल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खेळाडूंचा खुराक कसा आसावा , खेळातील दुखापती वर काय उपचार घ्यावेत यावर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच या प्रशिक्षण शिबिरांमध्ये खेळाडूंना तज्ञ क्रीडा मार्गदर्शकाचे मार्गदर्शनाखाली खेळातील विविध कौशल्ये देखील शिकविण्यात येणार आहेत .या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरा मध्ये जवळजवळ 550 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये राज जाधव , तुषार मोहिते , स्वप्निल पाटील, तायप्पा शेंडगे , उत्तम घोरपडे , सुळ सर, तांबे सर , जाधव डी एन , सुरज ढेंबरे , अमित काळे ,बाबर सर, रोहन निकम , कुमार पवार, कु.धनश्री क्षीरसागर , गव्हाणे मॅडम, सुहास कदम , गंगतीरे अविनाश हे विविध खेळांसाठी मार्गदर्शन करणार आहेत .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. खुरंगे बी.बी. यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ यांनी केले तर आभार क्रीडा समितीचे सदस्य तुषार मोहिते यांनी मानले.