महाराष्ट्रात पहिल्यांदाच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक गितावरील हवाई चित्तथरारक एन्ट्रीने

**

 

फलटण टुडे (बारामती ) :-
बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, सावळचा 7 वे कलाअविष्कार वार्षिक (दोन दिवसीय) स्नेहसंमेलन ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरले.महाराष्ट्रात पहिल्यांदाच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक गितावरील हवाई चित्तथरारक एन्ट्रीने सर्व उपस्थितांच्या मनावर अधिराज्य केले.यासाठी ऐडवेंचर मास्टर नरेश लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.
 वार्षिक स्नेहसंमेलनातील महाराष्ट्रातील पहिल्यादांच ऐतिहासिक,वास्तव नृत्याची विद्यार्थ्यांनी केलेली मांडणी उल्लेखनीय ठरली.
  कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व ज्ञानसागर पुरस्कार वितरण शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला वहिनीसाहेब पवार यांच्या शुभहस्ते झाले.दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन मा. संपत गावडे (गटशिक्षण अधिकारी)यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी सन 2023 चा ज्ञानसागर समाजभूषण पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय शरयु फौंडेशनच्या कार्याबद्दल शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वहिनीसाहेब पवार यास देऊन गौरवण्यात आले.तसेच इतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.मनोज खोमणे, डॉ. निकिता मेहता, संग्राम सोरटे(उद्योजक), हर्षदा खारतोडे (आर.टी.ओ.इनस्पेक्टर) कुमार देवकाते(सुप्रसिद्ध निवेदक), बाळासाहेब जाधव,राजेश लोहाट यास “ज्ञानसागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात पत्रकार बांधव जितेंद्र जाधव , ज्ञानेश्वर रायते, जयदीप भगत, प्रशांत ननवरे,नविद पठाण, अनिल सावळे पाटील, समीर बनकर, अमोल तोरणे,यांना सन्मानीत करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये श्री गणेश वंदना, देशभक्ती गीते, लोककलेतील मराठी हिंदी गीते ,लावणी, भारुड ,बालगिते,रामायण, रिमिक्स गितांनी व ऐतिहासिक शिवरायांवरील नृत्य गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालक व विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी प्रास्ताविक केले व शर्मिला वहिनीसाहेब पवार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ज्ञानसागर गुरुकुल सावळ हे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थ्यांची संस्कारक्षम पिढी घडविणारी आदर्श संस्था आहे असे सांगितले.
 प्रा. सागर आटोळे यांनी संस्थेच्या कार्याचा यशाचा चढता आलेख प्रस्ताविकातुन मांडला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्रीराम सावंत व सहशिक्षिका वर्षा होले यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे सर यांनी मांडले.
यावेळी ज्ञानसागर गुरुकुल सावळचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे , विभाग प्रमुख गोरख वनवे , मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते राधा नाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!