फलटण टुडे ( गोखळी प्रतिनिधी) :
गोखळी ग्रामपंचायत कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सुमनताई गावडे यांच्या हस्ते म.फुले प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच अभिजीत जगताप ,माजी उपसरपंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, राजेंद्र भागवत, ज्ञानेश्वर घाडगे,. निखिल भारती, सुरेश अप्पा चव्हाण, जालिंदर भंडलकर,सौ.विद्या जगताप, रमेश उकिर्डे उपस्थित होते.तसेच हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .मोहन ननावरे सर यांनी म.फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून यावेळी सुप्रिया धायगुडे मॅडम, शुभांगी धायगुडे मॅडम, किरण पवार सर राजेंद्र भागवत,शरद निकाळजे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार किरण पवार सर यांनी मानले.