अन्नधान्यातील भेसळ कशी ओळखाल?"

फलटण टुडे :

महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागातून उपमुख्य दक्षता अधिकारी म्हणून 20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेले श्री अशोक कुंदप हे एक समाज सेवेने झपाटलेले व्यक्तिमत्व होय.केवळ नोकरीत असतानाच नव्हे तर,निवृत्ती नंतरही आपले ज्ञान, अनुभव याचा समाजासाठी कसा उपयोग होईल ? याचा केवळ विचारच न करता ते प्रत्यक्ष कृती करीत असतात.

कुंदप यांच्या या कृतिशिलतेचे महत्वाचे पाऊल म्हणजे नुकतेच त्यांनी लिहिलेल्या
“अन्नधान्यातील भेसळ कशी ओळखाल ?” या अत्यंत जीवनोपयोगी पुस्तकाचे प्रकाशन सातारा येथे वैधमापण विभागाच्या उपनियंत्रक ज्योती पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले.यावेळी व्यासपीठावर कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर, न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ,महाकालिका ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड हेमंत कासार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून या पुस्तकाचे विविध प्रकारे महत्व विशद करून
श्री कुंदप यांच्या कार्याचे कौतुक केले.

 या वेळी प्रा प्रमोद दस्तुरकर आणि निशिकांत धुमाळ यांनी करिअर विषयक मार्गदर्शन केले.
तर युवा उद्योजक अभिषेक नाळे आणि प्रणित कुंदप यांनी प्रेरणादायी अनुभव कथन करून युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन केले.
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाकलिका ट्रस्ट च्या वतीने श्री कुंदप यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच न्यूज स्टोरी टुडे पोर्टल तर्फे संपादक श्री देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी ही श्री अशोक कुंदप व सौ आशाताई कुंदप यांचा सत्कार केला. इतरही अनेक व्यक्तींनी त्यांचा सत्कार केला.
 
या भरगच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रश्मी हेडे यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!