फलटण टुडे (बारामती ): –
बारामती एमआयडीसी मधील जिटीएन इंजिनिअरिंग कंपनी मध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उद्धव मिश्रा, उप महाप्रबंधक संतोष कणसे, युनियन अध्यक्ष पांडुरंग पवार, ज्ञानदेव चामे, शरद कुलकर्णी व अक्षय ब्लड बँक संचालिका अनिता जाधव व कर्मचारी उपस्तीत होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या माध्यमातून प्रत्येकाने रक्तदान करून मानव धर्म व देश धर्म पाळावा असेही जिटीएन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उद्धव मिश्रा यांनी सांगितले
तर सामाजिक कार्य व सामाजिक जाण व भान ठेवून कार्य करण्यास जिटीएन उद्योग समहू प्रयत्नशील असल्याचे उप महाप्रबंधक संतोष कणसे यांनी सांगितले या वेळी ५० कर्मचारी बांधवांनी रक्तदान केले
आभार अनिता जाधव यांनी मानले
प्रत्येक रक्तदात्यास प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले