फलटण टुडे (फलटण ):-
यंदाच्या शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची एकमताने निवड केली असून सदरची बैठक “लक्ष्मी विलास” निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती यावेळी फलटण तालुक्यातील सर्वांनी मिळून यावर्षी एकच शिवजयंती साजरी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण फलटण तालुक्याच्यावतीने फलटणमध्ये एकच शिवजयंती साजरी करण्यात येते. मागील वर्षी फलटण तालुक्यातील सर्वांनी मिळून यावर्षी एकच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार मागील वर्षी शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली होती.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही एकच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरले असून याच पार्श्वभूमीवर आज दिनांक ७ एप्रिल 2023 रोजी सायंकाळी “लक्ष्मी विलास” या निवासस्थानी शिवजयंती उत्सव समितीच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीदरम्यान सर्वानुमते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची यंदाच्या शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.यावेळी फलटण तालुक्यातील व शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.