फलटण टुडे ( फलटण ):
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2022-23 (Brain development scholarship exam ) या परीक्षेत श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर , फलटण ची इयत्ता पहिली मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. सई मनोज कदम हिने 100 पैकी 97 गुण प्राप्त करून देशात 15 वा क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल मिळवीले .
या यशाबद्दल तिचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती तथ विद्यमन आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच मा. फ.न.प. फलटण च्या मा. नगरसेविका श्रीमंत सुभद्राताई नाईक निंबाळकर ,श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, श्री भाऊसाहेब कापसे , विक्रमसिंह नाईक निंबाळकर, तुषार भैय्या नाईक निंबाळकर यांनी तिच्या या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
या यशामध्ये सईला आई-वडिलांचे व प्राचार्या सौ खलाटे मॅडम श्री. मदने सर यांचे मार्गदर्शन लाभले .