फलटण टुडे (बारामती ): –
महिलांनी संसार करताना मुलांचे संगोपन करताना,स्वतःला वेळ द्या, स्पर्धा सकारत्मक करा, भावना व्यक्त करा ,पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे व वयाच्या विविध वळणावर आरोग्याची काळजी घ्या व रुई मधील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचे प्रेरक कार्य आदर्शवादी व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला वहिनी पवार यांनी केले.
मंगळवार 21 मार्च रोजी रुई येथे प्रा अजिनाथ चौधर व रंजना चौधर यांच्या वतीने जागतिक महिला दिन व गुढी पाडवा निमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व गुणवंत महिलांचा सन्मान शर्मिला पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या वेळी पवार बोलत होत्या.
या प्रसंगी मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, त्रिवेणी उद्योग समहू च्या संचालिका शुभांगी चौधर
अनुपमा जोरी, वंदना मोहिते, साधना केकान ,रोहिणी चौधर व इतर मान्यवर उपस्तीत होते.
एकाचवेळी अनेक कामे करणारी महिला घर सांभाळते गरज पडली तर नौकरी करते, व्यवसाय करते व कुटूंबाचा विकास करण्यासाठी सर्वात जास्त योगदान परिस्थिती नुसार सामावून घेते त्यामुळे प्रत्येक महिला ही अद्वितीय असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले.
चूल व मूल विचारांच्या पलीकडे जाऊन महिलांनी विविध व्यवसाय, नोकरी, शेती मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांना शाबासकी म्हणून व या पुढे मोठ्या आत्मविश्वासाने कार्य होणे साठी हा कौतुक सोहळ्याचे आयोजन केल्याचे प्रा. अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
रुई मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव असल्याचे मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.
यशस्वी उद्योजिका म्हणून अनेक क्षेत्रात सन्मान झाला परंतु गावामधील सत्कार म्हणजे माहेरचा मुलीला मिळालेला सन्मान असल्याचे पुरस्कारार्थी शुभांगी चौधर यांनी सांगितले तर पुरस्कार हा कायमस्वरूपी आठवणीत राहून सकारत्मक ऊर्जा देईल असे रुपाली घोडके यांनी सांगितले.
प्रत्येक महिलेस भगवा फेटा, सन्मान चिन्ह व पर्यावरण चा संदेश सर्व दूर जाणे साठी रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार रंजना चौधर यांनी मानले .
—————————————