फलटण टुडे(आसू आनंद पवार ) :
गोखळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर ती विजय संपादन करत जल्लोष केला.
नुकतीच सोसायटी शंभर वर्ष पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असून या सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षात गोखळी विकास सोसायटी वरती सत्ताधाऱ्यांनी वर्चस्व मिळवले विरोधकांचं पानिपत करत सर्व राजकीय प्रतिष्ठित मंडळींच्या विचाराचा विजय समर्पित करत सोसायटी वरती सर्वांच्या विचाराचा झेंडा रोवण्यात सत्ताधारी नेतेमंडळींना यश आले .
विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घाम फोडला कोणतीही राजकीय ताकत नसताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विजयासाठी जंग जंग पछाडायला लावले अखेर आज मतदान झाल्यानंतर सर्व सत्ताधारी गटाचे तेरा उमेदवार विजयी झाले .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाला सकाळी सुरुवात करण्यात आली त्यानंतर ठीक पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली ही मतमोजणी सहकार विभागाच्या एस. डी.कुलकर्णी यांच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात आली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यामध्ये सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
निकाल घोषित होताच सर्व तेरा उमेदवारांसह गोखळी , खटके वस्ती गवळीनगर पांचबिघा जगताप वस्ती, साठेफाटा आदी गावातील सर्व नेतेगण सोसायटीचे सभासद नवनिर्वाचित सर्व संचालक संचालिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली व आनंद साजरा केला.