महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी फलटण तालुका सर्व संघटना समन्वय समिती शाखा फलटण जिल्हा सातारा.रक्तवीर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून भव्य रक्तदान शिबिर सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी आयोजित केला असून बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.रक्तदान वार सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी सकाळी ९.०० ते संध्या. ७.३० वा. दरबार हॉल, प्रांत अधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस,( अधिकार गृह) सीटी बिल्डींग जुने कोर्ट परिसर, फलटण. येथे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सर्व संपामधिल कर्मचारी यांनी या ठीकाणी उपस्थित राहून रक्तदान करावे व करून घ्यावे असे अवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे .
यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबासाठी एक वर्षासाठी एक ब्लड बॅग मोफत दिली जाईल. तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रोत्साहन पर भेट दिली जाईल असे आयोजकामार्फत सांगण्यात आले आहे .