महिला सन्मान योजनेच्या शुभारंभा निमित्त फलटण आगारात महिला प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
महिला सन्मान योजनेच्या शुभारंभा निमित्त फलटण आगारात महाविद्यालयीन मुलींचे गुलाब पुष्प देऊन आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
फलटण टुडे (फलटण दि.१७ ) :
नुकताच महाराष्ट राज्याचां अर्थसंकल्प राज्यांचे ऊपमुख्यमंञी तथा अर्थमंञी ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सादर केला.
या अर्थसंकल्पात महिलांना एस.टी.बसमधे प्रवास करताना ५० % सवलत म्हणजेच अर्धे तीकीट सुरु करण्याची घोषणा अर्थसकल्पात केली होति.
आज दि.१७/३/२०२३ पासुन वरील योजना प्रत्याक्षात एस.टी.महानमंडळा कडुन अंमलात आणली गेलि.या योजनेला महिला सन्मान योजना नाव देण्यात आले आहे.
या योजनेच्या शुभारंभा निमित्त फलटण आगारात महिला प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक रोहित नाईक,सहाय्यक वाहतुक निरिक्षक सुखदेव अहिवळे, धिरज अहिवळे,वाहतुक नियंञक संजय ऊराडे,हनुमंत जाधव,नितीन गोतपागल, वाहक श्रीपाल जैन व कार्यशाळा कर्मचारी ऊपस्थीत होते.
यावेळी आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांनी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेची माहिती देऊन महिलांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त महिला प्रवाशी यांनी एस.टि.बसने प्रवास करावा असे आवाहन केले.