फलटण टुडे (फलटण ) :
“आईचं जिणं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलं. जिद्दीने संसार करीत पोरांना उच्च शिक्षण देऊन संस्काराचे धडे दिले. त्यांच्या स्मृती निमित्तानं कुटुंबातील सदस्यांनी रक्षाविसर्जन नदीत न करता घराशेजारी वृक्षरोपण करुन समाज्यासमोर आदर्श निर्माण केला.” असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.
पणदरे नजिक धुमाळवाडी येथील कोकरेवस्ती वरील मातोश्री कै. कृष्णाबाई वामन कोकरे (वय ८०) यांना देवाज्ञा झाली. सावडण्याच्या दिवशी त्यांची तिन्ही मुले दादासाहेब , तुकाराम , ज्ञानदेव व तीन मुली यांनी सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबिवला आहे. सध्या ग्रामीण भागात प्रबोधनाच्या निमित्तानं प्रा. रवींद्र कोकरे सर हा उपक्रम राबवित आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सामाजिक जनजागृती होत आहे. पंचक्रोशीत रक्षाविसर्जन रानातच करुन वृक्ष लागवड चळवळ सुरु आहे.