फलटण टुडे (सातारा, दि. 16 ) :-
यंदाच्या वर्षी 11 एप्रिल ही महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात अभिनव पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्यांच्या विचारांविषयी वकृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. या स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 3 लाख व प्रत्येक विभागास 10 लाख रुपयांचा निधी महाज्योती मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर यांनी कळवीले आहे.