श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना निवेदन देताना सौ निलम देशमुख , सौ जयश्री शिंदे , दिलीप जाधव , मनोज कदम , उत्तम घोरपडे व इत्यादी मान्यवर
फलटण टुडे (फलटण दि 16 ) :
‘‘जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप सुरु आहे. राज्य कर्मचार्यांची पेन्शनची मागणी ही त्यांच्या हक्काची असून त्यांच्या या मागणीला आपला पाठींबा आहे’’, अशी भूमिका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली.
जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी दि. 14 मार्च 2023 पासून गेली तीन दिवस फलटण येथील अधिकारगृह येथील दरबार हॉल मध्ये राज्य सरकारी कर्मचार्यांचे बेमुदत संप आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर फलटण एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर आंदोलनाचे निवेदन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना दिले; त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवेदन देण्यासाठी सौ नीलम देशमुख मॅडम , सौ राजश्री शिंदे मॅडम , सौ नाईक निंबळकर मॅडम, सौ कुमठेकर मॅडम ,शुभांगी पवार, काशीद मॅडम श्री भाऊसाहेब कापसे मनोज कदम , उत्तम घोरपडे , श्री दिलीप जाधव, दत्तात्रय मुळीक, शैलेश जगताप, प्रीतम लोंढे, बापू सूर्यवंशी, , जयदिप देशपांडे , संजय गोफणे , चेतन बोबडे , सुरंजन पावरा , माळवदे सर , मोरे सर , बोंद्रे सर ,सोमनाथ माने, मनोज ढावरे, तसेच यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .