फलटण टुडे(बारामती ):
विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक व्यंकटेश रामपूरकर यांना मुंबई आयआयटीच्यावतीने पुरस्कार मिळाला आहे. आयआयटी मुंबई मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पोकन टुटोरियल सर्टिफिकेशन कोर्सेसचे गेल्या काही वर्षात योग्य पद्धतीने नियोजन करून तीन हजाराहून अधिक सर्टिफिकेशन विद्यार्थ्यांकडून करून घेतल्याबद्दल व्यंकटेश रामपूरकर यांना स्पोकन टुटोरियल मास्टर पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थिनी मानसी परदेशी व अक्षदा पाटील यांनाही स्टार अवॉर्ड ने सन्मानित केले. प्राचार्य आर.एस. बिचकर, चैतन्य कुलकर्णी, विशाल कोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. येत्या काळात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जातील असे प्राचार्य बिचकर यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त सुनेत्रा पवार, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी अभिनंदन केले.