युवा महोत्सव उद्घाटन समारंभाला उपस्थित पै. बापुराव लोखंडे, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्राचार्य डॉ नरेंद्र नार्वे, मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करणारा बावडा येथील संघ
फलटण टुडे (फलटण):
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे युवा महोत्सव उद्घाटन महाराष्ट्र केसरी पै. बापुराव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या युवा महोत्सवाच्या अंतर्गत विविध क्रीडा प्रकार जसे की क्रिकेट,व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, अँथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कँरम, बुद्धिबळ या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व स्पर्धा महाविद्यालयातील अंतर्गत खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येत असतात यातून महाविद्यालयातील उत्तम खेळाडू निवडून विद्यापीठ स्पर्धेसाठी पाठवले जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.नरेंद्र नार्वे यांनी दिली.
क्रिडा स्पर्धांच्या बरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, रांगोळी, चित्रकला, फोटोग्राफी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून ४ मार्च २०२३ पर्यत महाविद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवता यावेत यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की सर्व खेळाडूंनी खेळ खेळत असताना खिलाडू वृत्ती दाखवावी. हार जित या खेळाच्या बाजु आहेत त्यांचा जास्त विचार न करता मनमोकळेपणाने खेळ केल्यास यश नक्कीच मिळते. या युवा महोत्सव उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री . बापूराव लोंखडे- महाराष्ट्र केसरी ,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य खो- खो असोसिएशन, व सेक्रेटरी , फ.ए.सो.फलटण. फ.ए.सोसायटी , फलटणचे गै. कौ, सदस्य – मा. शिवाजीराव घोरपडे साहेब, मा. श्री . शिरीष भोसले , मा.श्री . नितीन गांधी,प्रशासन अधिकारी मा.श्री . अरविंद निकम सर, अधिक्षक मा.श्री .श्रीकांत फडतरे सर,फ.ए.सो. क्रीडा समिती सदस्य श्री . महादेव माने, श्री . संजय फडतरे महाविद्यालयाचे प्राचार्य. डाँ. एन. जी. नार्वे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे क्रिडा संचालक तायाप्पा शेंडगे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांनी प्रास्ताविक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.