फलटण टुडे (सातारा दि. 20 ):
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील थेट कर्ज योजनेंतर्गत आर्थिक व भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मंजूर एकूण 126 अर्जदारांपैकी 65 लाभार्थ्यांची निवड चिठ्ठी पद्धतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, लाभार्थी निवड समिती, सातारा यांच्या उपस्थितीत 50 टक्के पुरुष व 50 टक्के महिला आरक्षणा नुसार 22 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात होणार आहे. तरी लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक श्री. आर.एच. चव्हाण यांनी केले आहे