अजिंक्य मेनसे यांच्या भव्य रहिवासी व व्यवसायिक प्रकल्पाचे उदघाटन संपन्न
फलटण टुडे (बारामती ):
बारामती चा चौफर विविध क्षेत्रात विकास होत असताना बारामती च्या बांधकाम क्षेत्राच्या वैभवात ‘ सैफरॉन ईन्फ्रा ‘ प्रकल्प भर पाडेल असा विश्वास राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.(शिवजयंती 19 फेब्रुवारी 2023)
संदीपा पावर लाईन्स चे संचालक अजिंक्य मेनसे यांनी सुरू केलेल्या सुर्यनगरी येथील सेफरॉन आयकॉन या रहिवासी व व्यवसाईक प्रकल्पाचे भूमिपूजन व कंपनीच्या उदघाटन वेळी अजित पवार बोलत होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जय पाटील, तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, उद्योजक आर एन शिंदे, अर्जुन देसाई व नगरसेविका कमल कोकरे, इतर मान्यवर उपस्तीत होते.
बारामती तालुका असून सुद्धा जिल्हास्तरीय विकास होत असल्याने अनेकांना बारामती मध्ये स्वतःचे घर हवे आहे अशा वेळी उत्तम गुणवत्ता व दर्जा देत केलेले बांधकाम या क्षेत्रामध्ये स्वतःची नवीन ओळख करून देईल त्यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकून कै. संदीप मेनसे याच्या नावाला साजेलसे कार्य करावे त्याचप्रमाणे सैफरॉन ईन्फ्रा मुळे सर्व सामान्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण होईल असेही अजित पवार सांगून शुभेच्छा दिल्या.
सुर्यनगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी
१५ गुंठ्याच्या जागेमध्ये व्यवसाईक गाळे व रहिवासी गृहप्रकल्प असून नामांकित कंपनीचे सर्व साहित्य व उत्तम दर्जाचे बांधकाम देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अजिंक्य मेनसे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार श्रीमती स्नेहाताई मेनसे यांनी मानले.