फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई गोधन केले जप्त
फलटण टुडे ( फलटण ) :
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशननेएकूण ०७ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ३३,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एकुण ०३ जण अटकेत
मा. समीर शेख सोो, पोलीस अधीक्षक, मा. बापू बांगर सो, अपर पोलीस अधीक्षक व मा. तानाजी बरडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक मा. धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीसांची सातत्य पुर्वक चकदार कामगिरी
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतुन जर्सी गाई चोरीच्या गुन्हयांनी डोके वर काढले होते. जर्सी गाईच्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, सातारा मा. समीर शेख सो यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मा. बापू बांगर सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. तानाजी बरडे सो व पोलीस निरीक्षक मा. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणा-या जर्सी गाईच्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन विशेष पथक तयार करण्यात आले होते हे विशेष पथकाने वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने गोपनीय तसेच तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी नामे विनोद निवृत्ती खरात रा. भांडवली ता.माण, संतोष शामराव सोनटक्के, रा. भांडवली ता. माण जि. सातारा, सतिश रमेश माने रा. तोंडले ता. माण यांना शिताफीने पकडले आहे.
त्यांच्याकडे वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला केल्यावर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशसन हद्दीत ०३ ठिकाणी, औंध पोलीस स्टेशन, मेढा पोलीस स्टेशन, लोणंद पोलीस स्टेशन याठिकाणी असे ०७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे ३३,५०,०००/- रुपये किंमतीच्या त्यामध्ये ०९ जर्सी गाई, २ वाहने जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींचेकडून व ०३ फरारी आरोपींच्या कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. समीर शेख सोो, पोलीस अधीक्षक, मा. बापू बांगर सोो, अपर पोलीस अधीक्षक, मा. तानाजी बरडे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक मा. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दिक्षीत, पोलीस उपनिरीक्षक, सहा. पोलीस फौजदार राऊत, पोलीस नाईक अभिजीत काशिद, पोलीसनाईक अमोल जगदाळे, पोलीस कॉस्टेबल महेश जगदाळे, पोलीस कॉस्टेबल विक्रम कुंभार यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.