फलटण टुडे ( गोखळी प्रतिनिधी) :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील नव्याने सुरू झालेल्या तिरंगा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पहिलेच स्नेहसंमेलन संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने इटलीचे पाहुणे भारावले. .यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी बारामतीचे विद्यमान नगरसेवक किरण दादा गुजर म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता रणजीत शिंदे आणि मनोज गावडे यांनी तिरंगा पब्लिक स्कूल गोखळी सारख्या खेडेगावात सुरू करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व सुविधांचे दालन विद्यार्थी आणि पालकांना या निमित्ताने खुले करून दिले आहे या खुल्या करून दिलेल्या दालनाचा फायदा करून घ्यावा असे आवाहन करून किरणदादा पुढे म्हणाले, जग जवळ आले आहे आणि जवळ आलेल्या जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान जर आत्मसात केले नाही तर कुठेतरी पाठीमागे राहणार का ? अशी खंत होती ते तंत्रज्ञान आपण गोखळी सारख्या खेडेगावातील शेतकरी आणि सर्वसामान्य मुलांना देऊ पाहताय आहे त्यात तुमचे कौतुकच आहे स्नेहसंमेलन हा शिक्षण संस्था, पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुवा साधणारा स्नेहभाव वाढविणारा कार्यक्रम आहे.यानिमित्ताने आपल्या पाल्याचे अनेक कला गुण आपल्याला पाहायला मिळतात.निश्चित कौतुक वाटते स्नेहसंमेलनाचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत चाललय आपण आपल्या पारंपारिक कला, लोक कला, संस्कृती यापासून बाजूला जातोय आणि प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळा जेव्हा चालवल्या जातात तेव्हा या शाळा मधून भारतीय संस्कृती थोडीफार हद्दपार होती का की काय ?अशी भीती वाटत असताना. आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा पारंपारिक बाज टिकून ठेवण्याची काम ज्या संस्था करत आहेत तसेच काम आपली संस्था करेल कारण आपल्या संस्थेच्या नावातच तिरंगा आहे त्यामुळे या शब्द तील अर्थ आपण खोलवर घेतला तर सर्वांना सामावून घेणारा जशी भारताची संस्कृती आहे त्याच पद्धतीने काम आपण कराल अशी अपेक्षा किरणदादा गुजर यांनी व्यक्त केली.. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना फलटण येथील कृष्णाई मेडिकल ॲड रीसर्स फाऊंडेशन निकोप हाॅस्पिटलचे डॉ .जे.टी. पोळ म्हणाले की, गोखळी सारख्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण तिरंगा फाऊंडेशनचे माध्यमातून रणजित शिंदे,मनोज गावडे यांनी उपलब्ध करून दिले शिक्षण संस्था सुरू करणे एवढी सोपी गोष्ट नाही त्यांना साथ देणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सांगून डॉ पोळ पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी या तिरंगा पब्लिक स्कूलच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या कृष्णाई मेडिकल ॲड रीसर्स फाऊंडेशनचे निकोप हाॅस्पिटलच्या वतीने मोफत करून देण्यात येतील असे डॉ. जे.टी.पोळ सांगितले. प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन बारामती नगरपालिकेचे नगरसेवक किरणदादा गुजर,निकोप हॉस्पिटलचे डॉक्टर जे.टी. पोळ,इटलीचे न्याजी ख्रिश्चन, डि हॅटिओ लीया यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून हस्ते करण्यात झाले.
या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपली पारंपरिक महाराष्ट्राची लोकधारा, दमलेल्या बाबाची कहाणी असे अनेक सुदंर नृत्य तसेच शिवराज्याभिषेक सोहळा इत्यादीचे सादरीकरण करून विदयार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी क्रिडास्पर्धेमध्ये प्रथम ,
द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याना मेडल व प्रशस्ति पत्रक देवून सन्मानित करण्यात आले.
.
या स्नेहसंमेलनास . किरणदादा गुजर –
( ट्रस्टी- विद्या प्रतिष्ठान, नगरसेवक, बारामती नगरपरिषद)
मा. श्री. डॉ. जे.टी पोळ (निकोप हॉस्पिटल, फलटण)
डॉ. निकम, (डेंटीस्ट) , गोखळीच्या सरपंच सौ.सुमनताई गावडे त्याच बरोबर
इटलीचे – न्याजी खिश्चन, डि-हॅटीओ लीया, कॅकीस्टची, कॅटालाॅनो स्टॅफानो,हॅटोको मायकल, बॅरी सेलीब्रात तसेच संस्थेचे सचिव श्री. मनोज(तात्या) गावडे,
संस्थेच्या संचालक सौ. रजनीताई शिंदे, संस्थेच्या संचालक सौ. रेखाताई गावडे , स्कूलच्या उपप्राचार्य सौ. पुजा बारवकर , सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, उपस्थित पालक व ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.