जळोची मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नंदुरबार चा संघ विजयी

** 

नंदुरबार च्या विजयी संघा समवेत मान्यवर

फलटण टुडे (बारामती ): 
जळोची येथील महाकालेश्वर स्पोर्ट्स क्लब व दत्तकृपा युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री महाकाळेश्वर चषक 2023 निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन क्लबचे अध्यक्ष अक्षय एकनाथ शेरे मित्र परिवाराच्या वतीने जळोची येथे करण्यात आले होते
या स्पर्धेचे उद्घाटन दि.11 फेब्रु.रोजी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले
या स्पर्धेमध्ये राज्यातील 16 संघानी सहभाग नोंदविला.सलग तीन दिवसीय चाललेल्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एन. टी. पी. एस. नंदुरबार व द्वितीय पारितोषिक बी. सी. फाऊंडेशन नांदेड,तृतीय पारितोषिक बारामती स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी,चतुर्थ पारितोषिक बी सी फाऊंडेशन पुणे यांनी पटकिवला.
बक्षिस वितरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
या वेळी विद्याधर काटे,सचिन आवाळे,प्रताप पागळे,नितीन सरक,श्रीरंग जमदाडे,दादासाहेब देवकाते,अमोल पिसाळ,किशोर मासाळ,सुधीर पानसरे,सचिन वाघ,अमोल सातकर, अतुल बालगुडे,सोमनाथ गायकवाड,श्रीजीत पवार,दिनेश जगताप,शैलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलसावळे पाटील यांनी केले व आभार क्लबचे अध्यक्ष अक्षय शेरे यांनी मानले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!