फलटण टुडे वृत्तसेवा : –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर
विभागातर्फे आयोजित केलेल्या एच. एस. सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ ची बैठक व्यवस्था श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मिडियम स्कूल व ज्युनि. कॉलेज , जाधववाडी फलटण केंद्र क्र. ०१०५ येथे करण्यात आली आहे . येथे विज्ञान शाखेचे सर्व पेपर पारपडतील .
श्रीमंतशिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जाधववाडी फलटण या ठिकाणी एकुण विद्यार्थी संख्या ६८९ आहे. परंतु या केंद्रावरती फक्त ५०० विद्यार्थांची बेठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. उर्वरीत १८९ विद्यार्थांची बैठक व्यवस्था उपकेंद्र सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , स्वामी विवेकानंद नगर , फलटण येथे उर्वरीत वरील ( १८९ ) विद्यार्थींची बैठक व्यवस्था ही फक्त दि.२१ फेब्रुवारी २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२३ आणि ०१ मार्च २०२३ रोजी अनुक्रमे इंग्रजी , भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयासाठीच असेल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी .
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होत आहे. श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज जाधववाडी , फलटण येथे विज्ञान शाखेच्या बैठक क्रमांक X012875 ते X013376 या ५०० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था येथे केलेली आहे. तर उपकेंद्र येथे सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज स्वामी विवेकानंद नगर फलटण येथे इंग्रजी , भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयासाठी ही बैठक व्यवस्था असेल या ठिकाणी बैठक क्रमांक X013377 ते X013568 या नंबर पर्यंत १८९ विद्यार्थांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे तरी इयत्ता१२ वी विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित
केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळख पत्र (आयडेंटी कार्ड ) व लेखनसाहित्य
घेऊन शालेय गणवेशात परीक्षा वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणा–या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या
आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने / उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई केली गेली आहे.
तसेच विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी
सहकार्य करावे असे आवाहन श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज जाधववाडी फलटण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बोराटे एस. बी. व प्राचार्या सौ. एस.एस.
फाळके, पर्यवेक्षक श्री. एम. पी. निंबाळकर व प्रविण शहा यांनी असे आवाहन केले आहे.