१३ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण
फलटण टुडे(सातारा दि. 13 ) :
जेईई मेन्स ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच या परिक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे आणि यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाज्योतीला आणि त्या माध्यमातून शिकवत असलेल्या सर्व प्रशिक्षक वर्गास दिलेले आहे. ज्यांनी नियमित, वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जुळून त्यांना समजेल असे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारुन वेळोवेळी त्यांच्या शंकेचे निरसन केले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी या योजनेचा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.